विश्रांतवाडी – नियोजनबद्ध आखणी, पदयात्रा, धारदार मुद्दे आणि प्रचारसभांच्या धडाक्याने वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काॅंग्रेस- महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी झंझावाती प्रचार सुरू ठेवला आहे. पठारे यांचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. त्यांच्या प्रचारसभांना मिळालेला मोठा प्रतिसाद त्यांना निवडणुकीत मोठी आघाडी मिळवून देणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. बड्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवसापासून पठारे यांना पाठिंबा जाहीर केल्याने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पठारे यांच्या प्रचार सभांमध्ये वडगावशेरीतील स्थानिक प्रश्नांवर ठोस उपाययोजनांची आश्वासने दिली जात आहेत. विशेषतः स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट प्रोजेक्ट यावर भर दिल्यामुळे मतदारांमध्ये या मोहिमेचा चांगलाच प्रभाव पडत आहे. स्थानिक पातळीवरील पाणीटंचाई, वाहतूक समस्या आणि नागरी सुविधा सुधारणा या मुद्द्यांवर पठारे यांच्या प्रचाराचा भर राहिला आहे. पठारे यांच्या जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध नेतृत्व या भूमिकेला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. उत्कृष्ट प्रचारतंत्र, स्थानिक प्रश्नांवरील ठोस भूमिका, आणि ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा यामुळे बापूसाहेब पठारे यांची विधानसभा निवडणुकीत विजयाकडे वाटचाल सुरू आहे. वडगाव शेरीच्या जनतेसाठी पठारे हे एक आश्वासक आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत, अशी चर्चा मतदारसंघात आहे.