पुणे : आंबेगावकरांनो सावधान! तालुका 400च्या उंबरठ्यावर

एकूण 391 जणांना लागण
मंचर – आंबेगाव तालुक्यात करोनाबाधितांची संख्या 400च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. शुक्रवारी (दि. 7) 13 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
जवळे येथे सात, अवसरी खुर्द, पेठ, मंचर, घोडेगाव येथे प्रत्येकी एक आणि चास येथे दोन असे एकूण 13 बाधित रुग्ण एकाच दिवसात सापडले आहेत. तालुक्यात आतापर्यंत 391 जणांना करोनाची लागण झाली असून 132 जणांवर उपचार सुरू आहेत तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 251 जण करोनावर मात करीत घरी परतले आहे.
दरम्यान, करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घरा बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगावचे सहायक निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे.





