#Pune | फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची बदनामी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Updated On:

पुणे (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय ५२, रा. वडगाव शिंदे, हवेली) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
काकडे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने 7 मे ला फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले होते. त्यानुसार त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी राजेंद्रचे स्टेशनरी विक्रीचे दुकान आहे.





