Pune Accident | लोहगावमध्ये दुर्दैवी अपघात ; घरासमोर खेळत असताना निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मोटारीच्या धडकेत दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना लोहगाव येथील हवाई दलाच्या वसाहतीत घडली. याप्रकरणी मोटारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.विदार्थ विपीन मावी (वय २) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी विदार्थचे वडील विपीन राजसिंग मावी (३४, सध्या रा. हवाई दल वसाहत, लाेहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपीन मावी हे हवाई दलात अधिकारी आहेत.
त्यांचा मुलगा विदार्थ गुरुवारी (११ सप्टेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास घरासमोर खेळत असताना वसाहतीतल एका मोटारचालक महिलेने घरासमोर खेळणाऱ्या विदार्थला धडक दिली. अपघातात विदार्थ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी मोटारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार धेंडे तपास करत आहेत.




