Pune Accident | सविंदणे रस्त्यावर भीषण अपघात! हायवा चालकाचा जागीच मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
मंचर – सविंदणे (ता. शिरूर) येथील अष्टविनायक रस्त्यावर हायवा गाडी आणि टीपर गाडी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात हायवाचालकाचा मृत्यू झाला.मारुती अमृता गायकवाड (वय 65, रा. म्हसे बुद्रुक) यांचे अपघाती गुरुवारी (दि. 11)सायंकाळी सव्वापाच वाजता मंचर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सविंदणे गावच्या हद्दीत अष्टविनायक रस्त्यावर हायवा गाडी (एमएच 12 डब्ल्यूजे 8435) खडी भरून मलठण येथून पारगावच्या दिशेने येत असताना समोरून आलेल्या टाटा कंपनी टिप्पर गाडी (एमएच 42 एक्यू 7414) या वाहनांची धडक झाली.
या अपघातात हायवाचालक मारुती अमृता गायकवाड यांच्या हाता, पायाला डोक्याला आणि पोटाला गंभीर मारल्याने त्यांना उपचारासाठी पारगाव येथील ओम हॉस्पिटल आणि त्यानंतर मंचर येथील सिद्धी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांचे वैद्यकीय उपचार सुरू असताना निधन झाले. या अपघाताची फिर्याद मयत मारुती अमृता गायकवाड यांचा मुलगा सचिन मारुती गायकवाड यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली. अपघाताचे नेमके कारण समजले नाही.




