Pune Accident: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू
Updated On:

पुणे – सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना खडकीतील चर्च चौकात घडली. मधुरा शैलेश मिश्रा (21 रा. निगडी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक रवी देवानंद नाडे (रा. वाघोली ) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुराचा मित्र मंदार तांबे (20 रा. निगडी) याने फिर्याद दिली आहे.
मंदार आणि मधुरा कामानिमित्त पुण्यात आले होते. काम झाल्यानंतर ते निगडीकडे निघाले होते. खडकीतील चर्च चौकात सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. दुचाकीस्वार मधुरा आणि सहप्रवासी मंदार रस्त्यावर पडले. त्या वेळी ट्रकच्या चाकाखाली सापडून मधुराचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तपास करीत आहेत.




