Pune : विद्यार्थीनीची छेड काढल्याप्रकरणी एका शिक्षकाला अटक

पुणे – शाळेत विद्यार्थीनिची छेड काढल्याप्रकरणी एका शिक्षकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हडपसर परिसरातील एका शाळेत घडली.
याप्रकरणी मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार शिक्षक गणेश काकड (रा. फुरसुंगी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पिडीत मुलगी नववी इयत्तेत शिक्षण घेते तर आरोपी हा इंग्रजी विषय शिकवतो. तो जुलै महिन्यापासून पिडीत मुलीला टार्गेट करुन तीची छेड काढत होता.
तो तीला ‘इकडे तिकडे बघु नको मी सुंदर आहे. तसेच शाळेच्या गेटपाशी थांबून मी तुला घरी सोडवतो, तु कोठे रहातेस’ असे म्हणायचा. एकदा ती शाळेच्या मैदानावर खेळत असताना शिट्टी का वाजवली ? असे म्हणत तिच्यावर रागावला होता. तिच्यावर नेहमी लक्ष ठेऊन तिचा पाठलाग करत होता. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.





