Pune : अपघाताचे सत्र सुरूच! कात्रज-कोंढवा रोडवर भरधाव वाहनाने शाळकरी मुलींना उडवले
Pune Accident: एक मुलगी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक
Updated On:

पुणेः कात्रज-कोंढवा रस्त्यावर मंगळवारी दुपारी भरधाव वाहनाने दोन शाळकरी मुलींना धडक दिल्याची घटना घडली असून या अपघातात एक मुलगी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरी मुलगीही गंभीर जखमी झाली आहे.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहिती नुसार, मुली आपल्या वडिलांसोबत वाहनावरून जात असताना एका आयशर वाहनाने त्यांना धडक दिली. ही घटना दुपारी 1 वाजता कात्रज- कोंढवा रस्त्यावरील कपिलामृत डेअरीजवळ घडली. गंभीर जखमी मुलीवर उपचार सुरू असून, अपघात आणि पुढील पोलिस कारवाईबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींवरील वक्तव्य भोवलं? ; राहुल गांधींना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका





