पुणे : प्रभाग क्रमांक २६ मध्ये आज राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांच्या भव्य पदयात्रेने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. विजय प्रकाश ढेरे, सीमा मिलिंद काची, गणेश कल्याणकर, डॉ. रुपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. खडकमाळ अळी आणि आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण वातावरण राष्ट्रवादीमय झालेले पाहायला मिळाले. घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडला. रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधा या प्रश्नांवर ठोस काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला. महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. यंदा प्रभागात परिवर्तन होणार, अशा भावना नागरिकांतून व्यक्त होत असून आजच्या पदयात्रेमुळे राष्ट्रवादीच्या विजयाबाबतचा आत्मविश्वास अधिकच दृढ झाला आहे, असे मत विजय ढेरे यांनी यावेळी व्यक्त केले. आजची पदयात्रा हीच येणाऱ्या निवडणुकीतील निर्णायक विजयाची सुरुवात ठरेल, असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला.