Pune : ६ बडे नेते शिवसेनेच्या वाटेवर? टायगर अॅापरेशनची मदार सामंतांच्या हाती; बाबरांचा पक्षप्रवेश, धंगेकरांची भेट पडद्याआड काय घडतयं?

पुणेः विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी महायुतीला विजयाचा बुस्ट दिला. या निवडणुकीत घवघवीत यश महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांच्या वाटेला आलं. या निवडणुकीनंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे. यामुळे त्या दृष्टीने राज्यातील विविध ठिकाणची चाचपणी केली जात आहे.
शिवसेनेकडून काही धोरणांची पुनर्बांधणी देखील करण्यात येत आहे. यामुळे राज्यातील राजकारण चांगलच ढवळून निघालेले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीच्या दृष्टीने आघाडीतील पदाधिकारी महायुतीमध्ये सामील होत आहेत. नुकतीच माजी आमदार महादेव बाबर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात २५ सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसोबत शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जाते.
६ बडे नेते संपर्कात
शिवसेना शिंदे पक्षात इन्कमिंग वाढल्याचे दिसत आहे. यामुळे ठाकरेंच्या सेनेला हादरे बसू लागले आहेत. मुंबईत ठाकरे गटाने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे. इतर ठिकाणी मात्र आघाडीसोबत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यातच आता शिंदे गटाने अॅापरेशन टायगरची पकड आणखी मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ६ बडे नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
कालच माजी आमदार रविंद्र धंगेकर आणि हुसेन दलावाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मुंबईत भेट घेतल्याने या भेटी विषयी मोठी चर्चा केली जात आहे. तसेच आघाडीतील ६ नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्यापर्यंत याविषयी ठोस माहिती मिळालेली नाही. माजी आमदार रविंद्र धंगकरांनी याविषयी आपली प्रतिक्रिया दिली असून वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेना भेटलो असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
धंगेकर नेमक काय म्हणाले?
काल मी माझ्या वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेंना भेटलो. मी काही त्यांच्या पक्षात जाण्याचा विषय नव्हता. मी पक्षप्रवेश करणार नाही, मी घरातच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची भेट काल घेतली. बातम्या कीहीही येत आहे, त्यात काही तथ्य नाही. मला काही वाटलं तर अजूनही मी त्यांना भेटू शकतो, अजित पवरांनाही भेटू शकतो. अशी प्रतिक्रिया धंगेकरांनी आज सकाळी माध्यमांना दिली आहे.





