Pune : आरटीई प्रवेशाच्या ४,९५१ जागा रिक्तच
Updated On:

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर पुणे जिल्ह्यातील शाळांमध्ये १७ हजार ५८८ जागा असून, आतापर्यंत १२ हजार ६३७ बालकांचे प्रवेश झाले आहेत. नियमित फेरी व प्रतीक्षा यादीतील फेरी पूर्ण झालेली असताना अद्यापही ४ हजार ९५१ जागा रिक्तच आहेत. जिल्ह्यातील ९७० शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत ४८ हजार १५५ अर्ज दाखल झाले होते. त्यातून २० हजार ९७१ बालकांची निवड झाली.
राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २३८ जागा प्रवेशासाठी उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यासाठी दाखल झालेल्या २ लाख ४२ हजार ५१६ अर्जांतून १ लाख १६ हजार ८८५ बालकांना प्रवेश जाहीर झाला होता. त्यातील ७३ हजार ३२७ जागांवर बालकांचे प्रवेश झाले आहेत. तर ३१ हजार ९११ जागांवरील प्रवेशाच्या जागा रिक्तच पडल्या आहेत.





