PUNE: करोना जेएन-१ व्हेरियंटचे पुण्यात ३२७ रुग्ण

पुणे – राज्यात करोनाच्या जेएन-१ व्हेरियंटचे रुग्णांची संख्या सर्वाधिक पुण्यात आढळली आहे. पुण्यात तब्बल ३२७ रुग्ण झाले आहे. त्यामुळे जेएन-१ व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या ४५१ वरुन ६६२ वर पोहोचली आहे. यामध्ये राज्यात पुण्यानंतर ठाण्यामध्ये ८८ तर नागपूर ५५, छत्रपती संभाजीनगर ५४, तर मुंबईमध्ये ३६ रुग्ण आढळले आहेत.
जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालानुसार आढळलेल्या आरटी-पीसीआर कोविड रुग्णाचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. यामध्ये नवीन रुग्णांमध्ये जेएन-१ व्हेरियंट आढळून आला आहे. सध्या राज्यात जेएन-१ व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या ६६२ इतकी झाली आहे. राज्यात जेएन-१ व्हेरियंट रुग्णांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात ३२७ आहे. त्याखालोखाल ठाणे ८८, नागपूर ५५, छत्रपती संभाजीनगर ५४, मुंबई ३६, अमरावती १८, रायगड १४, सोलापूर १३, कोल्हापूर ११, सांगली ७, रत्नागिरी ५, जळगाव ५, हिंगोली ४, आहमदनगर ३, बीड ३, चंद्रपूर ३, गटचिरोली २, नांदेड २, नाशिक २, धाराशिव २, आकोला २, सातारा १, सिंधुदुर्ग १, यवतमाळ १ आणि नंदरबार १ असे एकूण ६६२ रुग्णसंख्या झाली आहे.





