Pimpri : मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पिंपरी : मराठा सेवा संघाच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरूवारी (दि. १९) विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले.या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रकाश जाधव, राज्य पदाधिकारी प्राचार्य रामकिशन पवार, ॲड लक्ष्मण रानवडे, संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार, मनोज गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या स्मिता म्हसकर, सुनिता शिंदे, सुलभा यादव, अश्विनी पाटील, रेखा गुळवे आदी उपस्थित होते.
मराठा सेवा संघाची दिनदर्शिका पूर्णपणे अंधश्रद्धा मुक्त असून या दिनदर्शिकेत प्रत्येक दिवशी इतिहासात घडलेल्या घटनांची नोंद आहे. ही दिनदर्शिका मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांच्या कार्याला समर्पित केली आहे. २०२५ हे खेडेकर यांचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. असे प्रकाश जाधव यांनी मनोगतात सांगितले. या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे यांनी पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीच्या निवडी जाहीर केल्या.
डाॅ. शिवाजीराव ढगे, शहर सचिव सुनिल जाधव, सहसचिव दिलीप गावडे, सहसचिव संपतराव जगताप, कोषाध्यक्ष वसंतराव पाटील, उपाध्यक्ष प्रकाश बाबर, उपाध्यक्ष मंचक जाधव, उपाध्यक्ष वाल्मिक माने, उपाध्यक्ष विजय शिंदे, संघटक अरूण घोलप, संघटक संदीप नवसुपे, संघटक सत्यशिल जाधव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
राज्य कार्यकारिणी सदस्य प्राचार्य रामकिशन पवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच, मराठा सेवा संघाच्या कार्याची माहीती देऊन पदाधिकाऱ्यांनी सभासद नोंदणी अभियान राबविण्याचे आवाहन केले. याप्रसंगी बीड जिल्ह्य़ातील मस्साजोगचे युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी ॲड लक्ष्मण रानवडे, शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या सुलभा यादव यांनी मार्गदर्शन केले.





