PT Usha IOA : आरोप-प्रत्यारोप अन् धक्कादायक निकाल! सायना नेहवालने मारली बाजी, पण पी. टी. उषा कशा हरल्या?
PT Usha IOA : आयओए स्पोर्ट्सपर्सन ऑफ मेरिट निवडणुकीत पीटी उषा यांचा पराभव, सायना नेहवाल आणि अंजू बॉबी जॉर्ज यांनी विजय मिळवला.

PT Usha Fails To Win SOM Election IOA President Post In Jeopardy Saina Nehwal Wins : भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अंतर्गत राजकारणात मोठा भूकंप झाला असून विद्यमान अध्यक्षा पी. टी. उषा यांना ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ मेरिट’ (SOM) निवडणुकीत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या या निवडणुकीत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने बाजी मारत महिला प्रतिनिधींमध्ये स्थान मिळवले. सायनासोबतच लांब उडीतील दिग्गज अंजू बॉबी जॉर्ज, माजी तिरंदाज डोला बॅनर्जी आणि माजी महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल यांची ‘एसओएम’ म्हणून निवड झाली आहे. एकूण ८० मतदारांनी (४० पुरुष आणि ४० महिला) या चार महिला प्रतिनिधींची निवड केली.
चार पुरुष प्रतिनिधींची बिनविरोध निवड; पी. टी. उषा यांच्या अध्यक्षपदावर टांगती तलवार
यापूर्वी शनिवारी ऑलिम्पिक पदक विजेते गगन नारंग, बॉक्सर विजेंदर सिंग, कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि माजी टेबल टेनिसपटू कमलेश मेहता यांची चार पुरुष ‘एसओएम’ प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड झाली होती. इतर आठ उमेदवारांनी माघार घेतल्याने हा मार्ग सुकर झाला होता. मात्र, उषा यांच्या पराभवामुळे आता ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या आयओए कार्यकारी परिषदेच्या निवडणुकीत त्या अध्यक्षपदासाठी उभ्या राहू शकतील का, असा गंभीर पेच निर्माण झाला आहे. यासाठी त्यांना कोणत्याही राष्ट्रीय क्रीडा महासंघाकडून (NSF) नामांकन मिळणे आवश्यक आहे, ज्याची शक्यता सध्या अत्यंत धूसर मानली जात आहे.
आचारसंहिता भंगाचे आरोप अन् व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद –
🚨🚨🚨BREAKING – IOA SOM Elections
Anju Bobby George, Rani, Dola Banerjee and Saina Nehwal have been elected in the female category.
PT Usha, the current IOA president, lost the SOM elections.
Gagan Narang, Kamlesh Navinchandra Mehta, Yogeshwar Dutt and Vijender Singh had already been elected unopposed as Sportspersons of Outstanding Merit (SOMs) in the male category in the IOA elections 2026.
#IOAElections2026 #IndianSports
— RevSportz Global (@RevSportzGlobal) November 9, 2026
आयओएच्या घटनेनुसार अध्यक्षपदाच्या उमेदवाराला ‘एसओएम’ किंवा सर्वसाधारण सभेचा सदस्य असणे बंधनकारक असते. २०२२ मध्ये उषा याच मार्गाने पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पी. टी. उषा यांनी निवडणूक अधिकारी संजय कुमार श्रीवास्तव यांच्याकडे प्रतिस्पर्धी डोला बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. बॅनर्जी यांच्या नावाने व्हॉट्सॲप मेसेज फिरवून ‘न्यू भारत पॅनेल’साठी मते मागितली जात असल्याचा आणि आचारसंहितेचा भंग केल्याचा गंभीर आरोप उषा यांनी केला होता.
सत्ता आणि संसाधनांच्या गैरवापराचाही झाला आरोप –
𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗢𝗹𝘆𝗺𝗽𝗶𝗰 𝗔𝘀𝘀𝗼𝗰𝗶𝗮𝘁𝗶𝗼𝗻 (𝗜𝗢𝗔) 𝗣𝗿𝗲𝘀𝗶𝗱𝗲𝗻𝘁 𝗣.𝗧. 𝗨𝘀𝗵𝗮 𝗳𝗮𝗶𝗹𝗲𝗱 𝘁𝗼 𝗴𝗲𝘁 𝗲𝗹𝗲𝗰𝘁𝗲𝗱 𝗮𝘀 𝗮 𝗦𝗽𝗼𝗿𝘁𝘀𝗽𝗲𝗿𝘀𝗼𝗻 𝗼𝗳 𝗠𝗲𝗿𝗶𝘁 (𝗦𝗢𝗠) 𝗶𝗻 𝘁𝗵𝗲 𝗲𝗹𝗲𝗰𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗰𝗼𝗻𝗱𝘂𝗰𝘁𝗲𝗱 🚨
Usha, who polled 40 votes, finished fifth in the election and will therefore not be a part of the general body for the IOA and will be ineligible to contest for the post of President in the next elections.
🔗: https://t.co/rN4wJiWNWz |📸: Shashi Shekhar Kashyap
#PTusha #IOA
— Sportstar (@sportstarweb) November 9, 2026
दुसऱ्या बाजूला राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता वेटलिफ्टर सतीश शिवलिंगम यांनीही निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेत थेट उषा यांच्यावरच निशाणा साधला. आयओए अध्यक्षांच्या पदाचा आणि संघटनात्मक साधनांचा गैरवापर करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवलिंगम यांनी केला. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मतदानात अखेर उषा यांना पराभवाचा सामना करावा लागला असून, आता ५ डिसेंबरच्या निवडणुकीत नव्या समीकरणांना वेग आला आहे.





