शेतकऱ्याकडून लाच घेताना पीएसआयला रंगेहात अटक
Updated On:

लातूर – बळीराजाला देशाचा अन्नदाता, जगाचा पोशिंदा म्हणून गौरवले जाते. मात्र, त्याच अन्नदात्याकडे लाच मागितल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. शेतातील बांधावरुन झालेल्या भांडणात गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली होती.
मात्र, लाल लुचपत अधिकाऱ्यांनी या पीएसआयला रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेननंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरुन भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलिसाने तक्रारदाराकडून 25,000 रूपये लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती 20,000 लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदारास तहसील कार्यालयाच्या प्रागंणातून रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलीस उप निरीक्षकाला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.





