Bangladesh Protest : बांगलादेशसात पुन्हा आंदोलन उसळले; वस्त्रोद्योग कारखाने पुन्हा बंद
बांगलादेश हा चीननंतर जगातील दुसरा सर्वात मोठा वस्त्र निर्यातदार देश आहे. या क्षेत्रात चाळीस लाखांहून अधिक कामगार काम करतात आणि देशाच्या निर्यात उत्पन्नापैकी ८० टक्क्यांहून अधिक वाटा या क्षेत्राचा आहे.

Bangladesh Protest – बांगलादेशातील वस्त्रोद्योग कामगारांनी रविवारी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली असून १३ कापड कारखाने बेमुदत बंद करण्यात आले आहेत. तर पाच कारखान्यांनी एक दिवसाची सुटी जाहीर केली आहे.
कापड उद्योगातील कामगारांच्या वेतनाची रचना निश्चित करण्यासाठी नियुक्त केलेल्या वेतन मंडळाची बैठक होण्यापुर्वीच हे आंदोलन पुन्हा सुरू झाले आहे.
गाझीपूरच्या कोनाबारी आणि मौचक भागामध्ये आंदोलक कामगार एकत्र आल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पिटाळून लावण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि मोठ्या आवाजाचे ग्रेनेड फेकले.
या आंदोलनामुळे औद्योगिक क्षेत्रातील ५० कापड उद्योग बंद करण्यात आले. कामगारांचे वेतन किमान १२ हजार ५०० टकावरून ३० हजार टका एवढे वाढवण्यात यावे, अशी कामगारांची मागणी आहे.
वेतन निश्चित करण्यासाठी सरकारने १ नोव्हेंबरला वेतन मंडळाची स्थापना केली आहे. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत हं मंडळ आपल्या शिफारसी करणार आहे. सुधारित वेतन रचना १ डिसेंबरपासून लागू होण्याची शक्यता असून, कामगारांना नवीन वेतनश्रेणीनुसार त्यांचा पहिला पगार जानेवारी महिन्यात मिळेल.
मात्र कामगार पुन्हा कामावर रूजू झाले नाहीत, तर कारखाने बेमुदत बंद करण्याचा इशारा वस्त्रोद्योग मालकांनी दिला. तर पाच उद्योगांनी एक दिवसाची सुटी जाहीर केल्यामुळे पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
बांगलादेश हा चीननंतर जगातील दुसरा सर्वात मोठा वस्त्र निर्यातदार देश आहे. या क्षेत्रात चाळीस लाखांहून अधिक कामगार काम करतात आणि देशाच्या निर्यात उत्पन्नापैकी ८० टक्क्यांहून अधिक वाटा या क्षेत्राचा आहे.






