‘पंजाबचे काही लोक शेतकऱ्यांचा मुखवटा धारण करून …’ ; मनोहर लाल खट्टर यांच्या वक्तव्यावरून राजकीय खळबळ

Manohar Lal Khattar on farmers । हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या केंद्र सरकारमधील मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना शेतकरी आंदोलनाबाबत मोठे वक्तव्य केले. ते कैथल जिल्ह्यातील गुहला विधानसभेत भाजपचे उमेदवार कुलवंत बाजीगर यांच्या प्रचारासाठी आले होते. यादरम्यान खट्टर आपल्या भाषणात म्हणाले, ‘पंजाबमधील काही लोक शेतकऱ्यांचे मुखवटे घालून चढायला लागले होते. हे सर्व आम्ही एक वर्ष सहन केले. केंद्र आणि हरियाणाची सरकारे पाडण्याचा त्यामागचा हेतू होता” असा आरोप यावेळी त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पण ते शेतकरी नव्हते Manohar Lal Khattar on farmers ।
मनोहर लाल खट्टर पुढे म्हणाले, ‘मास्क घातलेले लोक ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला पोहोचले होते. तिथल्या लाल किल्ल्यावर चढले. ते शेतकरी नव्हते. आम्ही देशभक्त लोक आहोत. काही लोक तुम्हाला गोंधळात टाकतील. पण त्यांच्याकडून दिशाभूल करू नका. ते पुढे म्हणाले, ‘आता पंजाब-हरियाणा सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांनी प्रवाशांना त्रास दिला आहे. पण राज्य सरकारने त्यांना सीमेवर रोखले आणि पुढे जाऊ दिले नाही याचा आनंद हरियाणातील लोकांना आहे.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
काही लोक शेतकऱ्यांचा मुखवटा घालून बसले Manohar Lal Khattar on farmers ।
पुढे बोलताना खट्टर म्हणाले, ‘आम्ही हा मार्ग खुला करण्याची योजना आखली होती, पण दुसऱ्या बाजूला काही लोक शेतकऱ्यांचा मुखवटा घालून बसले आहेत, ज्यांना व्यवस्था बिघडवायची आहे. हे लोक आहेत ज्यांना स्थिर सरकारे अस्थिर करायची आहेत. तपशीलात जाण्याची गरज नाही, ते कोण आहेत हे देखील तुम्हाला माहिती आहे. मनोहर लाल खट्टर यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. खट्टर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्या कुमारी सेलजा म्हणाल्या, ‘भाजपला शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. राहुल गांधी यांची शेतकऱ्यांप्रती बांधिलकी आहे.
दरम्यान ,काँग्रेसने आपल्या एका पोस्टमध्ये,” भाजपने शेतकऱ्यांचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही” मंत्री खट्टर यांच्या या वक्तव्यावरून भाजपचा शेतकरी विरोधी चेहरा दिसून येतो”. असे म्हटले आहे. नुकतेच मंडीतील भाजप खासदार कंगना राणावत यांनी रद्द केलेले कृषी कायदे परत आणले पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी स्वतः केंद्र सरकारकडे त्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली पाहिजे, असे म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावरुन वाद वाढल्यानंतर कंगनाने एक व्हिडिओ जारी करत आपली खंत व्यक्त केली आणि ती आपले शब्द परत घेणार असल्याचे सांगितले.





