Pune District : एलआयसी प्रतिनिधींचे उद्या पुण्यात आंदोलन
Updated On:

चाकण : भारतीय जीवन विमा (एलआयसी) प्रतिनिधी न्याय हक्क मागणीसाठी मंगळवारी (दि. 17) पुणे येथील विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. अशी माहिती लियाफी या विमा प्रतिनिधीच्या संघटनेचे पश्चिम विभागिय खजिनदार प्रमोद छाजेड यांनी दिली.
एलआयसीने ऑक्टोबर महिन्यापासून विमा विक्री बाबत व प्रतिनिधींच्या कमिशनमध्ये बदल केले आहेत. हे बदल विमा प्रतिनिधींसाठी नुकसान कारक व अडचणीचे आहेत असे त्यांनी सांगितले. हे बदल व्यवस्थापनाने मागे घ्यावेत आणि जाचक अटी रद्द कराव्यात.
अशा अनेक मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. आरोग्य विमा रकमेची वसुली विमा एजंटांकडून केली जाते हा नियम रद्द करून कंपनीच्या वतीने आरोग्य विमा करण्यात यावा. टर्म इन्शुरन्स साठी वयाची मर्यादा वाढवावी. या काही प्रमुख मागण्या आहेत.





