अभिनेत्री कंगना रणौतच्या वक्तव्याचा निषेध; पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तीव्र आंदोलन

पुणे – ‘1947 साली देशाला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली’, अभिनेत्री कंगना रनौतच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, बालगंधर्व चौक, पुणे येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
आपल्या महान भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांच्यापासून शहीद भगतसिंग , सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस या महान नेत्यांनी निकराचा लढा दिला. मात्र केवळ हुकूमशहांच्या पायाशी निष्ठा वाहून कालपरवा पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या कंगना रनौत या अभिनेत्रीने “1947 साली देशाला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली” असे संतापजनक वक्तव्य करून देशाच्या स्वतंत्र्यासाठी शहीद झालेल्या तमाम वीरांचा अवमान केला आहे. भारत देशाच्या अस्मितेवर हा थेट हल्ला असल्याचे म्हणत कंगना रनौतच्या या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख , नगरसेवक सचिन दोडके, महिला शहराध्यक्ष मृणालीनी वाणी, युवती शहराध्यक्ष सुषमा सातपुते, युवती प्रदेश सरचिटणीस पूजा झोळे, कार्याध्यक्ष अँड.श्रुती गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या निषेध आंदोलनात सहभागी होऊन देशद्रोही कंगना रणावरच्या विरोधात आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौतच्या वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळलू असून त्यांच्या कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या शहरात पोलिस ठाण्यात त्यांच्या या वक्तव्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. काॅंग्रेसच्या अनेक नेत्यांनी कंगना यांच्यावर देशद्रोहाचा खटला चलवावा अशी मागणी केली आहे. या आठवड्यात अभिनेत्री कंगनाला देण्यात आलेला पद्म पूरस्कार मागे घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.





