नीट परीक्षेसाठीची वयोमर्यादा हटवली
Updated On:

नवी दिल्ली – नीट परीक्षेसाठीची वयाची मर्यादा केंद्रीय आरोग्य मंत्रालयकडून हटवण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी “नॅशनल एलिजिबिलिटी ऍण्ड एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) परीक्षेसाठी यंदापासून जनरल कॅटगरीसाठीची 25 वर्षे ही कमाल वयोमर्यादा आणि राखीव प्रवर्गासाठीची 30 वर्षाची वयोमर्यादा हटवण्यात आली आहे.
नीट परीक्षेसाठी परीक्षार्थीचे किमान वय 17 वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच ही परीक्षा वयाची 25 वर्षे पूर्ण होईपर्यंतच देता येईल, असा नियम होता. मात्र आता ही वयोमर्यादा हटवण्यात आली आहे. या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केले आहे.





