Rohit Pawar : ‘खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी’; रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ
Rohit Pawar : यासंदर्भात त्यांनी एक्सवरुन ट्वीट करत अजितदादांचं अपघात प्रकरण अतिशय भयानक असून, या प्रकरणात CID कडे माहिती देऊनही कारवाई होत नाही.

Rohit Pawar : २८ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी मोठा धक्का देणारा दिवस होता. या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. बारामतीजवळ त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं.
अजित पवार यांच्या विमान अपघाती प्रकरणावर सातत्याने आक्रमक भूमिका घेत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. अनेक पत्रकार परिषदा घेत त्यांनी अपघात प्रकरणाला घेऊन विविध दावे केले आहेत. (Rohit Pawar)
विमान अपघात प्रकरणाचे कनेक्शन आता भोंदू अशोक खरातसोबत लावले जात असून, रोहित पवारांनी खरातच्या फोनवर सर्वाधिक कॅाल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर येत असून, ‘त्या’ सहा दिवसांत खरातने चार फोन बदलले, तर एक फोन केवळ १९ मिनिटांचा कॉल करून बदलला. खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
अजितदादांचं अपघात प्रकरण अतिशय… pic.twitter.com/8PN8tsTRRS
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 19, 2026
यासंदर्भात त्यांनी एक्सवरुन ट्वीट करत अजितदादांचं अपघात प्रकरण अतिशय भयानक असून, या प्रकरणात CID कडे माहिती देऊनही कारवाई होत नाही. त्यामुळे तात्काळ CBI कडे हा तपास देणं गरजेचं आहे, अशी मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर येत असून, ‘त्या’ सहा दिवसांत खरातने चार फोन बदलले, तर एक फोन केवळ १९ मिनिटांचा कॉल करून बदलला. खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
अजितदादांचं अपघात प्रकरण अतिशय भयानक असून, या प्रकरणात CID कडे माहिती देऊनही कारवाई होत नाही. त्यामुळे तात्काळ CBI कडे हा तपास देणं गरजेचं आहे. सीबीआयकडे तपास देण्यासंदर्भात सरकार त्वरित कार्यवाही करेल, ही अपेक्षा आहे. सरकारने आता जास्त उशीर करायला नको, अन्यथा हे संशयाचं धुकं अधिक गडद होईलच, शिवाय गुन्हेगार पुरावे सुद्धा दडपतील.
हेही वाचा : Sharad Pawar : “भारताबाहेर मोदी देशाची प्रतिष्ठा जपण्याचे काम करतात”; शरद पवारांकडून पंतप्रधानांचे कौतुक






