रावेत : चिंचवड येथील महात्मा फुले मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी सावता महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी महापौर अनिता फरांदे यांनी संत शिरोमणी यांची महती सांगताना सांगितले की पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी राज्यातील अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. मात्र संत शिरोमणी सावता महाराजांच्या भेटीला आरण येथे खुद विठ्ठलाची पालखी जाते यावरून संत शिरोमणी सावता महाराजांचे महत्व विषद होते. त्यानंतर महाआरती घेण्यात आली. यावेळी प्रदीप दर्शले, हणमंत माळी, नवनाथ कुदळे विनोद राऊत, अनिल साळुंखे सूर्यकांत ताम्हाणे, विश्वास राऊत, प्रशांत डोके, निलेश डोके, प्रकाश गोरे, विश्वास राऊत, विलास लेंडगर, विलास गव्हाणे, नरहरी शेवते, गोपाळ शिंदे, सुरेश फुलसुंदर, गुरूदास भुजबळ, भगवान दुधाळ, पांडुरंग शेंडे, रमेश गायकवाड, संदेश झोडगे, पोपट ताजणे, प्रदीप दळवी, पांडुरंग शेंडे, अपर्णा डोके, उर्मिला भुजबळ, अनिता ताटे, अलका ताम्हाणे, सविता पिंगळे, माया बरके, स्वाती गायकवाड, रत्नप्रभा भुजबळ, सविता शेंडे, माधुरी भोसले, शारदा राऊत इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.