मुंबई शेअर बाजाराचा नफा वाढला
Updated On:

मुंबई – मुंबई शेअर बाजाराचा नफा डिसेंबर अखेरच्या तिमाहीत दुपटीने वाढून 108 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी तिमाहीत कंपनीला केवळ 51 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते. डिसेंबर अखेरच्या तिमाहीत मुंबई शेअर बाजाराचा (Mumbai Stock Market) महसूल सर्वाधिक म्हणजे 431 कोटी रुपये मोजला गेला आहे.
गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीचा महसूल 245 कोटी रुपये होता. यामध्ये 76 टक्के वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या म्युच्युअल फंड व्यासपीठावरून झालेल्या व्यवहारात 60 टक्के वाढ होऊन 10.9 कोटी व्यवहार झाले आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत 6.86 कोटी व्यवहार झाले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कंपनी विस्तारीकरण करणार असल्याचे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.




