दिल्ली भाजपचे पहिले अध्यक्ष प्रो. व्ही.के. मल्होत्रा यांचे निधन ; वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Prof. V.K. Malhotra। भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि दिल्ली भाजपचे पहिले अध्यक्ष प्राध्यापक विजय कुमार मल्होत्रा यांचे आज सकाळीनिधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मल्होत्रा दिल्लीतील एम्समध्ये उपचार घेत होते आणि आज सकाळी ६ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिल्ली प्रदेश भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी ही माहिती देताना सांगितले की, प्राध्यापक मल्होत्रा यांचे जीवन साधेपणा आणि जनसेवेसाठी समर्पित होते. जनसंघ काळापासून त्यांनी दिल्लीत संघ विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी व्यापक काम केले. त्यांचे जीवन नेहमीच सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान राहिले आहे आणि राहील. Prof. V.K. Malhotra।
दिल्ली प्रदेश भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, प्राध्यापक विजय कुमार मल्होत्रा यांचे जीवन साधेपणा आणि जनसेवेसाठी समर्पणाचे उदाहरण होते. त्यांनी आपले जीवन जनतेच्या सेवेसाठी समर्पित केले. आज सकाळी त्यांचे निधन झाले.
दिल्लीत भाजपला बळकटी Prof. V.K. Malhotra।
प्रा. विजय कुमार मल्होत्रा यांनी जनसंघ काळापासून दिल्लीत संघ विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी व्यापक काम केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच दिल्लीत पक्ष मजबूत झाला.





