प्रसिद्ध प्रोडक्शन डिझायनर आणि आर्ट डायरेक्टर रजत पोतदार यांचे आकस्मिक निधन

मुंबई : मनोरंजनसृष्टीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘भूल भुलैया 3’ या चित्रपाटचे प्रोडक्शन डिझायनर आणि आर्ट डायरेक्टर रजत पोतदार यांचे निधन झाले आहे. रजत यांनी बर्फी, फायटर, पठाण सारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे. निर्माते अनीस बज्मी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून रजत पोतदार यांच्या निधनाची बातमी दिली.
अनीस बज्नी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं की “आज मी एका खूप जवळच्या मित्राला गमावलं आहे. एकतर खूप चांगली व्यक्ती आणि एक मास्टर प्रोडक्शन डिझायनरला मी गमावलं. तू खूप लवकर गेला. तू नेहमीच आठवणीत राहशील. रजत दा”
View this post on Instagram
अनीस बज्मीच्या या पोस्टवर सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनी दुःख व्यक्त केले. रजत पोद्दार हे केवळ प्रोडक्शन डिझायनरच नव्हते तर कला दिग्दर्शक देखील होते. रजत पोतदार ‘फायटर’, ‘पठाण’, ‘बर्फी’, ‘जग्गा जासूस’सह अनेक चित्रपटांचे प्रोडक्शन डिझायनर आहेत. त्याचबरोबर रजत पोद्दार ‘मर्डर’, ‘जन्नत’, ‘आवारापन’, ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटांशी कला दिग्दर्शक म्हणून जोडले गेले होते.





