“शरीरसंबंधाच्या आरोपावरून निर्मात्याला अटक.. पण कुस्तीपटूंनी आरोप केलेल्या राजकीय नेत्याला अटक नाही” बॉलिवूड अभिनेत्याच्या ट्विटने खळबळ

नवी दिल्ली – भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचा सुरु असलेला संघर्ष संपूर्ण देशाने पाहिला. एक महिन्यांपासून कुस्तीपटू आंदोलन करत असूनही सरकराने त्याची योग्य रित्या दखल न घेतल्याने अखेर कुस्तीपटूंनी आपले मेडल्स गंगेत टाकण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडींमध्ये ब्रिजभूषण सिंह यांच्यावर हवी ती कारवाई झाली नसल्याचे अनेकदा कुस्तीपटूंनी म्हंटले. अशात आता एका बॉलिवूड अभिनेत्याने बॉलिवूडमधील एक प्रकरणाचा दाखल देत नाव न घेता ब्रिजभूषण यांच्यावर निशाणा साधला आहे.
स्वतःला फिल्म क्रिटिक म्हणवणाऱ्या आणि सोशल मीडियावरून अनेकदा बॉलिवूड अभिनेत्यांना देखील टार्गेट करणारा कमल राशिद खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील केआरकेने एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्याने बॉलिवूडमधील एक प्रकरण सांगत कुस्तीपटूंच्या आंदोलनावर देखील प्रकाश टाकला आहे.
केआरके आपल्या ट्विटमध्ये म्हणतो,”एका मुलीने एफआयआर दाखल केला की 3 वर्षांपूर्वी एक निर्माता तिला भेटला होता, ज्याने तिचा हात पकडला आणि शरीर संबंधाची मागणी केली. मुलीकडे त्याचा नंबरही नव्हता. एसएमएस किंवा इतर कोणताही पुरावा नाही. तरीही पोलिसांनी त्याला अटक केली. एवढ्या कुस्तीपटू एका राजकीय नेत्यावर आरोप करत आहेत, पण पोलीस त्याला अटक करू शकत नाहीत. भारतात आज असा कायदा आहे” असं ट्विट केआरकेने केलं आहे.
A girl filed FIR that a producer met her 3years ago, who caught her hand and ask her to have sex with him. Girl was not having his number also. No sms or any other evidence. Still police arrested him. So many wrestlers are directly accusing a politician but police can’t arrest…
— KRK (@kamaalrkhan) June 15, 2023
या प्रकरणावरून पंतप्रधानांवर देखील कुस्तीपटूंनचे भाष्य
देशाला पदके मिळवून दिलेल्या कुस्तीपटूंचे एक महिन्यापेक्षा जास्त दिवस आंदोलन सुरू आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत अद्याप एकही मत व्यक्त केलेले नाही. त्यांचे मौन खूपच वेदनादायी आहे, अशा शब्दांत भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने भावना व्यक्त केल्या आहेत.





