पिंपरी | पिक इंटरनॅशनल स्कूलकडून मिरवणूक
Updated On:

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपळे सौदागर येथील पिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्या डॉ . धनश्री सोनवणे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. मुलांनी लेझीमचे प्रकार सादर केले. जय भवानी जय शिवाजीचे नारे देत शाळेचा परिसर दुमदुमून गेला.
आम्ही शिवबाचे मावळे म्हणत नृत्य सादर केले, पोवाडे सादर केले. मिरवणुकीमध्ये प्राचार्या धनश्री सोनवणे, उन्नती सोशिअल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संजय भिसे , पी. के . ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे मॅनेजर ऑफ डायरेक्टर रोहन काटे, प्रथमेश काटे आदी सहभागी झाले. यावेळी शिक्षकांनी भगवे फेटे परिधान करत मिरवणुकीत सहभाग दर्शवला.





