Pro Kabaddi 2024 : पाटणा पायरेट्स अन् जयपूर पिंक पँथर्सचे एकतर्फी विजय…

नोएडा :- प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामात शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी दोन जबरदस्त सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात तीन वेळचा चॅम्पियन पटना पायरेट्सने परदीप नरवालच्या बेंगळुरू बुल्सचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने तेलुगू टायटन्सचा एकतर्फी पराभव केला.
या सामन्यांनंतर गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. पटना पायरेट्सने 4 स्थानांनी झेप घेतली असून पॉइंट टेबलमध्ये ते आता तिसऱ्या स्थानावर आहेत. तर जयपूर पिंक पँथर्सनेही 3 स्थानांनी झेप घेत 5वे स्थान पटकावले आहे. तर तेलुगू टायटन्स दुसऱ्या स्थानावर आणि बेंगळुरू बुल्स शेवटच्या स्थानावर आहे.
पायरेट्सचा एकतर्फी विजय…
पहिल्या सामन्यात देवांक व आयन यांच्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर पाटणा पायरेट्स संघाने बेंगळुरू बुल्सला 54-29 असे तब्बल 25 गुणांनी पराभूत करताना 11 व्या प्रो कबड्डी लीगमध्ये आपली विजयी आगेकूच कायम राखली.
Patna make it 2-0 this season against the Bulls 🔥💚#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PatnaPirates #BengaluruBulls pic.twitter.com/zzBbyLgszq
— ProKabaddi (@ProKabaddi) November 30, 2024
पाटणा पायरेट्स संघाने चढाईतून 34 तर पकडीतून 13 गुणांची कमाई केली. त्याबरोबरीने बुल्स संघाला 3 वेळेस बाद करताना 6 गुण अधिकचे मिळविले. बुल्स संघाने 18 गुण चढाईतून तर 10 गुण पकडीतून मिळविले. देवांकने 6 बोनससह 17 गुणांची तर अयानने 2 बोनससह 13 गुणांची कमाई करताना संघाला मोठा विजय मिळवून दिला. शुभम शिंदेने 7 गुण मिळविताना त्यांना सुरेख साथ दिली. बुल्सकडून जय भगवानने 9 तर प्रदीप नरवालने 8 गुणांची कमाई करताना चांगली लढत दिली.
जयपूर पिंक पँथर्सचाही एकतर्फी विजय…
प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या हंगामातील 86 व्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने तेलुगू टायटन्सचा 41-28 असा पराभव केला. या सामन्यात फक्त विजय मलिकने तेलुगू टायटन्ससाठी चमकदार कामगिरी करत 17 गुण मिळवले.
पैंथर्स ने लगाई लंबी छलांग 🐾🔥#PKL11 सीज़न में टाइटंस को दूसरी बार दी शिकस्त 💪#ProKabaddi #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #JaipurPinkPanthers #TeluguTitans pic.twitter.com/MXJVRWVZF7
— ProKabaddi (@ProKabaddi) November 30, 2024
जयपूर पिंक पँथर्ससाठी अर्जुन देशवाल आणि नीरज नरवाल या दोघांनी सुपर 10 पूर्ण केले. अर्जुन देशवालने 11 तर नीरज नरवालने 12 गुण घेतले. या मोसमात जयपूर पिंक पँथर्सच्या दोन्ही रेडर्सनी एका सामन्यात सुपर 10 पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ आहे.





