Pro Kabaddi 2023 : प्रो-कबड्डी लीगचा थरार आजपासून; गुजरात जायंट्स व तेलगु टायटन्समध्ये सलामी…

अहमदाबाद – देशांतर्गत क्रीडा स्पर्धेतील देशीय खेळ असलेल्या व सध्या तुफान लोकप्रीय असलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेचा थरार आजपासून सुरु होत आहे. यंदाच्या स्पर्धेचे हे १० वे वर्ष असून येत्या शनिवारपासून येत्या गुरुवारपर्यंत अहमदाबादमध्ये सामने होतील. या मोसमातील सलामीचा सामना गुजरात जायंट्स आणि तेलुगू टायटन्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादमधील ‘द एरिना बाय ट्रान्सस्टेडिया’ येथे हा सामना होणार आहे. दुसरा सामना यू मुंबा विरुद्ध यूपी योद्धाज होणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत अहमदाबादनंतर ८ ते १३ डीसेंबर बंगळुरुत, १५ ते २० डीसेंबर पुण्यात, २२ ते २७ डीसेंबर चेन्नईत, २९ डीसेंबर ते ३ जनेवारी नोएडात, ५ ते १० जानेवारी मुंबईत, १२ ते १७ जानेवारी जयपूरमध्ये, १९ ते २४ जानेवारी हैदराबादमध्ये, २६ ते ३१ जानेवारी पाटणात, २ ते ७ फेब्रुवारी दिल्लीत, ९ ते १४ फेब्रुवारी कोलकातात तर, १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत पंचकुलामध्ये सामने होतील.
𝔹𝕃𝕆ℂ𝕂𝔹𝕌𝕊𝕋𝔼ℝ ℙ𝕂𝕃𝟙𝟘 𝕆ℙ𝔼ℕ𝕀ℕ𝔾 𝕎𝔼𝔼𝕂𝔼ℕ𝔻 is almost here 😍🔥
Watch #PKLSeason10 from 2nd December, 7:30 PM onwards, LIVE on Star Sports Network & free on @DisneyPlusHS mobile app 💙#ProKabaddi #HarSaansMeinKabaddi #Kabaddi pic.twitter.com/mPDmwF1kjb
— ProKabaddi (@ProKabaddi) November 30, 2023
२१ फेब्रुवारीला स्पर्धेचा अंतिम सामना पंचकुलातच रंगणार आहे. या स्पर्धेत बेंगॉल वॉरिअर्स, बंगळुरु बुल्स, दबंग दिल्ली, गुजरात जायंट्स, हरयाणा स्टीलर्स, जयपूर पिंक पॅंथर्स, पाटणा पायरट्स, पुणेरी पलटन, तमिळ थलैवाज, तेलगु टायटन्स, यु मुम्बा व युपी योद्धा असे १२ संघ एकमेकांशी लढत देतील.
2 डिसेंबर 2023
1- गुजरात जायंट्स विरुद्ध तेलुगु टाइटंस
2- यू मुंबा विरुद्ध यूपी योद्धाज
स्टारवर थेट प्रक्षेपण
देशाच्या इतिहासात सर्वात जास्त लोकप्रीय ठरलेली ही कबड्डी स्पर्धा चाहत्यांना रोज संध्याकाळी ८ वाजल्यापासून स्टार स्पोर्टस नेटवर्क या वाहिनीवर पाहता येणार आहे.
सामन्यांची वेळ काय असेल?
यावेळी एका दिवसात दोनपेक्षा जास्त सामने खेळवले जाणार नाहीत. ज्या दिवशी दोन (Pro Kabaddi 2023 complete schedule) सामने होणार आहेत, त्या दिवशी पहिला सामना रात्री 8 वाजता सुरू होईल आणि दुसरा सामना रात्री 9 वाजता सुरू होईल. त्याच वेळी, ज्या दिवशी एक सामना खेळायचा आहे, तो सामना 9 वाजता सुरू होईल. तसे, बहुतेक दिवशी दोन सामने खेळले जातील. दर सहा दिवसांनी विश्रांतीचा दिवस असेल. कारण सर्व संघ एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करणार आहेत.





