मन्नारा चोप्राच्या वडिलांच्या निधनानंतर प्रियांकाची भावुक प्रतिक्रिया

Priyanka Chopra | अभिनेत्री मन्नारा चोप्रा ‘बिग बॉस’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. नुकतेच मन्नारावर दु:खाचा डोंगर कोसळला. १६ जूनला मन्नाराचे वडील रमन राय हांडा यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रमन राय हांडा यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने शोक व्यक्त केला आहे.
प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. “तुम्ही कायमच आमच्या हृदयात राहाल. रमन काका तुमच्या आत्म्यास शांती लाभो, ओम शांती”, असं प्रियांका चोप्राने पोस्टमध्ये म्हटलं आहे. मन्नारा चोप्राचे वडील रमन हांडा हे प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्राचे काका होते. त्यांच्या निधनाने चोप्रा कुटुंबीय दु:खात आहे. Priyanka Chopra |
मिळालेल्या माहितीनुसार, रमन हांडा काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, याच दरम्यान त्यांच्या प्रकृती बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमन राय हांडा एक प्रसिद्ध वकील होते आणि दिल्ली उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. Priyanka Chopra |
रमन राय हांडा यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार
रमन राय हांडा यांच्या पार्थिवावर आज १८ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील अंबोली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. दुपारी १ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. Priyanka Chopra |
हेही वाचा:





