प्रियांकाचा पुन्हा अॅक्शन अवतार! ‘हेड्स ऑफ स्टेट’ चित्रपटात कॅामेडीचाही असणार तडका, ट्रेलर पाहा….

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने आपला हॅालीवूडमध्ये चांगला जम बसवला असून तिच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रियांका अॅक्शन करताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे नाव ‘हेड्स ऑफ स्टेट’ असून प्रियांकाने चित्रपटाच्या ट्रेलरसोबत एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे तिचे चाहते खूप आनंदी आणि उत्साहित झाले आहेत.
यासोबतच प्रियांकाने इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये ‘हेड्स ऑफ स्टेट’ कधी येणार आहे आणि कुठे पाहता येणार असल्याचे देखील सांगितले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरसोबत तिने एक कॅप्शन देखील दिले आहे. ‘शांत राहा आणि पुढे चालू ठेवा. #HeadsofState २ जुलै रोजी @primevideo वर येत आहे, असे तिने लिहिले आहे. प्रियांकाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
‘मला वाटते की हा चित्रपट मजेदार असेल’, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘क्वीन नेहमीप्रमाणेच अद्भुत आहे. जॅान सीनाच्या वाढदिवसानिमित्त ‘हेड्स ऑफ स्टेट’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये प्रियांका चोप्रा, जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांचे दमदार लूक प्रेक्षकांना आवडले आहेत. हा एक मजेदार आणि धमाकेदार अॅक्शन-कॉमेडी चित्रपट असून २ जुलै २०२५ रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा: जया बच्चन पुन्हा एकदा पापाराझींवर भडकल्या; व्हिडिओ व्हायरल





