जया बच्चन पुन्हा एकदा पापाराझींवर भडकल्या; व्हिडिओ व्हायरल

Jaya Bachchan | अभिनेत्री जया बच्चन अनेकदा पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेकदा त्यांना यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलही केले जाते. आता पुन्हा एकदा त्या पापाराझींवर संतापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अलीकडेच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका शर्बानी मुखर्जी यांचे वडील आणि राणी मुखर्जी-काजोल यांचे काका रोनो मुखर्जी यांचे निधन झाले. मंगळवारी त्यांच्यासाठी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. जया बच्चन त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदाबरोबर तेथे गेल्या होत्या.
पण, पापाराझीला पाहून जया बच्चन यांना राग आला. यावेळी श्वेता पुढे चालत गेल्या, पण जया बच्चन यांनी पापाराझींना पाहून रागाने म्हटले, “चला, तुम्ही सगळेही सोबत… बकवास” त्यांच्या या टिप्पणीमुळे गर्दीतील लोकही काहीसे अस्वस्थ झाल्याचे दिसले.
View this post on Instagram
यानंतर जेव्हा श्वेताने त्यांना गाडीत बसण्यास मदत केली तेव्हा जया पुन्हा एका पापाराझीवर ओरडल्या आणि म्हणाल्या, “या गाडीत बसा….” जया बच्चन यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान, जया बच्चन यांची पापाराझींवर भडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्या रागावल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली. Jaya Bachchan |
दरम्यान, रोनो मुखर्जी यांचे २८ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी ‘हैवान’, ‘तू ही मेरी जिंदगी’ यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले होते. Jaya Bachchan |
हेही वाचा:





