प्रियंका गांधींनी घेतली मंत्री नितीन गडकरींची भेट; नेमकी काय झाली चर्चा?

Nitin Gadkari-Priyanka Gandhi | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी भेट घेतली. एकीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. मात्र गडकरी आणि प्रियंका गांधी यांच्या भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र ही भेट प्रियंका गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातील रस्ते प्रकल्पांबाबत होती.
प्रियंका गांधी हसत म्हणाल्या, सर, मी जूनपासून आपल्या भेटीसाठी वेळ मागतेय. माझ्या मतदारसंघातील काही कामांसाठी कृपया वेळ द्यावा. प्रियंकांच्या मागणीवर नितीन गडकरी यांनी तात्काळ उत्तर देत सांगितले, कुठल्याही अपॉइंटमेंटची गरज नाही. आमचे दरवाजे नेहमी खुले असतात. तुम्ही प्रश्नकाळ संपल्यानंतर थेट माझ्या संसद कार्यालयात या, मी तुमची पूर्णपणे बाजू ऐकून घेईन. गडकरींच्या या उत्तराने सभागृहात क्षणभर हलकेफुलके वातावरण निर्माण झाले.
प्रियंका गांधी यांनी आपल्या वायनाड मतदारसंघातील 6 महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांबाबत गडकरींना निवेदन दिले. यावर चर्चा करताना गडकरींनी स्पष्ट केले की, यातील काही प्रकल्प राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार त्यावर थेट निर्णय घेऊ शकत नाही. मात्र, राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित इतर प्रकल्पांबाबत त्यांनी प्रियंका यांना सकारात्मक आश्वासन दिले.
Nitin Gadkari sat with Priyanka GANDHI Vadra and had breakfast with her.
She was there for resolution of Road construction in her constituency in Waynad.pic.twitter.com/dqkNomHAoV https://t.co/9Gp54bzncL— Prashant (@prashant10gaur) December 18, 2025
“भावाचं काम केलं, बहिणीचं का नाही करणार?”
प्रियंका गांधी आणि नितीन गडकरी यांच्या चर्चेदरम्यान गडकरींनी एका जुन्या आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले, “यापूर्वी राहुल गांधी यांनीही अमेठीतील काही रस्त्यांबाबत माझ्याकडे विनंती केली होती आणि मी ते काम पूर्ण केले होते. आता भावाचं काम केलं आणि बहिणीचं केलं नाही, तर लोक म्हणतील भावाचं केलं पण बहिणीचं केलं नाही.”
प्रियंका गांधींचे आदरातिथ्य
यावेळी केवळ राजकीय चर्चाच नाही, तर गडकरींनी आपल्या खास शैलीत प्रियंका गांधींचे आदरातिथ्यही केले. गडकरींनी आज स्वतः यूट्यूबवर पाहून तांदळाची एक अतिशय चविष्ट डिश बनवून घेतली होती. त्यांनी प्रियंका यांना ही डिश खाल्ल्याशिवाय न जाण्याचा आग्रह केला. आज गडकरींच्या कक्षात येणाऱ्या प्रत्येक खासदाराला ही डिश सर्व्ह केली जात होती. राजकीय मतभेद बाजूला ठेवून झालेल्या या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा:





