प्रकृती बिघडल्याने प्रियंका गांधी रूग्णालयात दाखल, ट्विट करत दिली माहिती

Priyanka Gandhi । प्रकृती बिघडल्याने कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज दिल्लीत रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज उत्तरप्रदेशात प्रवेश करणार आहे. त्यावेळी त्या तेथे सहभागी होणे अपेक्षित होते, परंतु आजारपणामुळे त्यांना ते शक्य झालेले नाही.
ही बाब त्यांनी स्वताच सोशल मिडीया हँडलवर जाहीर केली आहे. तथापि त्यांनी म्हटले आहे की “मी भारत जोडो न्याय यात्रेत उत्तरप्रदेशात सहभागी होण्यास खुपच उत्सुक होते पण मला आज रूग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. । Priyanka Gandhi
मैं बड़े चाव से उत्तर प्रदेश में भारत जोड़ो न्याय यात्रा के पहुँचने का इंतजार कर रही थी, लेकिन बीमारी की वजह से मुझे आज ही अस्पताल में भर्ती होना पड़ा। थोड़ा बेहतर होते ही मैं यात्रा में जुड़ूँगी। तब तक के लिए चंदौली-बनारस पहुंच रहे सभी यात्रियों, पूरी मेहनत से यात्रा की तैयारी…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 16, 2024
पण मी जेव्हा बरी होईल त्यावेळी मी निश्चीत या यात्रेत सहभागी होणार आहे. या यात्रेतील प्रत्येक कार्यकर्त्याला आणि राहुल गांधी यांना आपल्या शुभेच्छा आहेत असेही त्यांनी या संदेशात नमूद केले आहे.





