Priyanka Chopra : प्रियांका चोप्राचा ‘कान्स लायन्स फेस्टिवल’मध्ये ग्लॅमरस अंदाज; सिंपल लुकने वेधलं लक्ष
Priyanka Chopra : प्रियांकाने डिझायनर सिल्व्हिया चेरासी यांचा ‘कलर-ब्लॉक्ड’ हॉल्टर' ड्रेस स्टाईल केला आहे. प्रियांकाने ‘कान्स लायन्स फेस्टिवल’मध्ये तिचा साधा, पण अत्यंत आकर्षक असा लूक केला होता.

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) स्पष्टवक्तेपणासह तिच्या स्टायलिश लुकसाठी देखील ओळखली जाते. नुकतीच ती ‘कान्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिवल’मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या लुकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
प्रियांकाने डिझायनर सिल्व्हिया चेरासी यांचा ‘कलर-ब्लॉक्ड’ हॉल्टर’ ड्रेस स्टाईल केला आहे. प्रियांकाने ‘कान्स लायन्स फेस्टिवल’मध्ये तिचा साधा, पण अत्यंत आकर्षक असा लूक केला होता. (Priyanka Chopra )
supreme court: राम मंदिरातील दानचोरी प्रकरण ; सर्वोच्च न्यायालयाचा तात्काळ सुनावणी घेण्यास नकार
यावेळी तिने वेगवेगळ्या रंगांची रंगसंगती असलेला फॉईंग स्टाईल ड्रेस परिधान होता. या ड्रेससह तिने फ्रेडा साल्वाडोर ब्रँडच्या लेदर थॉन्ग सँडल्स स्टाईल केल्या होत्या. या सँडल्सची किंमत सुमारे ३५ हजार ५७४ रुपये आहे. त्यासह तिने गुलाबी रंगाचा नाजुक नेकलेस घातला होता. (Priyanka Chopra )
विशेष म्हणजे, प्रियांकाच्या डिझायनर सिल्व्हिया चेरासी यांच्या या ड्रेसची किंमत सुमारे १.८ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तिचा हया लुक अनेकांच्या पसंतीस पडला असून ‘कान्स लायन्स’ लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Priyanka Chopra
दरम्यान, ‘कान्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ क्रिएटिव्हिटी’ हा एक प्रतिष्ठित सोहळा मानला जातो. या पाच दिवसीय महोत्सवामध्ये सिनेमा, फॅशन आणि मनोरंजन विश्वातील विविध विषयांवर चर्चा केली जाते. यावेळी प्रियांकाने देखील तरुण पिढीचा सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन, नवीन कल्पना आणि महिलांची जबाबदारी या विषयांवर स्पष्ट मते मांडली. Priyanka Chopra
हेही वाचा:






