” ‘चल बे’ हे दोनच शब्द …” ; प्रियंका चतुर्वेदींनी बिलावल भुट्टोला दाखवली त्यांची जागा

Priyanka Chaturvedi on Bilawal Bhutto। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. एकीकडे भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे सिंधू पाणी करार थांबवण्यात आल्याने पाकिस्तानचा तिळपापड होत आहे/
नुकतेच पाकिस्तानी नेते आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी सिंधू नदीच्या पाण्याबाबत भारताला धमकी दिली आहे. ते म्हणतात, “सिंधूचे पाणी पाकिस्तानचे आहे आणि ते तसेच राहील. जर ते थांबवण्याचा प्रयत्न केला गेला तर एकतर सिंधू नदीत पाणी वाहेल किंवा भारतीयांचे रक्त वाहेल.”
प्रियंका चतुर्वेदी यांचे बिलावल भुट्टो यांना उत्तर – चल बे ! Priyanka Chaturvedi on Bilawal Bhutto।
अशा हास्यास्पद धमक्या दिल्याबद्दल बिलावल भुट्टो यांना भारतीय नेते योग्य उत्तर देत आहेत. या संदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बिलावल भुट्टो यांच्या विधानाला फक्त दोन शब्दांत उत्तर दिले आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी बिलावल भुट्टो यांच्या धमकीच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “चल बे!”
Just two words come to mind for him~ चल बे ! https://t.co/kJ9n2FVxsj
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) April 26, 2025
बिलावल भुट्टो काय म्हणाले? Priyanka Chaturvedi on Bilawal Bhutto।
बिलावल भुट्टो पाकिस्तानच्या जनतेसमोर असा दावा करत आहेत की भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे, जे चुकीचे आहे. बिलावल भुट्टो हे सिंधू नदी पाकिस्तानची असल्याचा दावा करतानाही दिसत आहेत. बिलावल भुट्टो म्हणाले, “मी सिंधू नदीजवळ उभे राहून भारताला सांगू इच्छितो की सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील. आमचे पाणी या नदीतून वाहेल किंवा त्यांचे रक्त वाहेल. असे होऊ शकत नाही की एखादा देश तुम्हाला सिंधू पाणी करार स्वीकारू नये असा निर्णय घेईल.”
‘बिलावल, तुमची मानसिक स्थिती तपासा’ – हरदीप पुरी
एवढेच नाही तर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या विधानावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की बिलावलने त्याची मानसिक स्थिती तपासली पाहिजे. हरदीप पुरी यांनी इशारा दिला की, भारताचा संयम आता संपला आहे. आम्ही हे आता सहन करणार नाही. काही दिवस थांबा.





