प्रियांका चतुर्वेदींनी ‘या’ 7 नेत्यांचा मांडला लेखाजोखा ; संपत्तीचा चढता आलेखच केला सादर , वाचा सविस्तर

Priyanka Chaturvedi । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षाकडून उमेदवारी दाखल करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी आपापल्या संपत्तीचा तपशील देखील निवडणूक आयोगापुढे सादर केला. यामध्ये महायुतीच्या नेत्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याच वाढलेल्या संपत्तीचा वाढणारा आलेख शिवसेना (ठाकरे गट ) नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी सादर केला आहे.
7 नेत्यांच्या नावाचा उल्लेख Priyanka Chaturvedi ।
ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी महायुतीच्या सात नेत्यांच्या संपत्तीत झालेल्या प्रचंड वाढीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चतुर्वेदी यांनी 7 नेत्यांची नावं आपल्या पोस्टमध्ये घेतली आहेत. यामध्ये गीता जैन, पराग शाह, राहुल नार्वेकर, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि धनंजय मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे.
अपक्ष आमदार असेल्या गीता जैन यांची संपत्ती 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी 70.44 कोटी इतकी होती. मात्र, त्यांनी यंदा सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा आकडा 392.30 कोटी रुपये इतका आहे. याचा अर्थ गेल्या पाच वर्षांमध्ये गीता जैन यांची संपत्ती तब्बल 322 कोटी रुपयांनी वाढला आहे.
तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे यांची संपत्ती 2019 मध्ये 38.09 कोटी रुपयांची होती. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीचा आकडा 129.81 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार असलेल्या पराग शाह यांची संपत्तीही वाढली आहे. 2019 साली पराग शाह यांची संपत्ती 500.62 कोटी इतकी होती. तर 2024 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात पराग शाह यांच्या संपत्तीचा आकडा 3383.06 कोटी रुपये इतका नमूद करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांमध्ये 26 कोटी रुपयांची वाढ Priyanka Chaturvedi ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनीही नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांची एकूण संपत्ती 11 कोटी 56 लाख 72 हजार 466 रुपये इतकी होती. गेल्या पाच वर्षात यात 26.12 कोटींची वाढ झाली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांची एकूण संपत्ती 37 कोटी 68 लाख 58 हजार 150 रुपये इतकी झाली आहे.
एकनाथ शिंदे यांची पत्नी लता शिंदे यांची संपत्ती 2019 मध्ये 6 कोटी 11 लाख इतकी होती. यात गेल्या पाच वर्षात 22 कोटी 85 लाख रुपयांची वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा त्यांची पत्नी लता शिंदे यांचे वार्षिक उत्पन्न अधिक आहे. एकनाथ शिंदे यांचे 2024 चे वार्षिक उत्पन्न 34 लाख 81 हजार रुपये आहे. तर, पत्नी लता शिंदे यांचे वार्षिक उत्पन्न 15 लाख 83 हजार इतके आहे.
हेही वाचा
“महायुतीचं सरकार येणार, येणार, येणार, आपल्याला चांगलं पद मिळणार, मिळणार, मिळणार” – अजित पवार





