प्रिया बापटचा धमाकेदार अंदाज; ‘अंधेरा’ हॉरर सीरिज ‘या’ दिवशी पाहता येणार
Priya Bapat | फरहान अख्तरच्या प्रॉडक्शन हाऊसनं तयार केलेली ‘अंधेरा’ ही हॉरर सीरिज सध्या चर्चेत आहे. यात प्रिया बापट आणि प्राजक्ता कोळी या दोन मराठमोळ्या कलाकार पाहायला मिळणार आहेत.
या सीरिजमध्ये प्रिया बापट आणि प्राजक्ता कोळी यांच्यासह करणवीर मल्होत्रा आणि सुरवीन चावला हे लोकप्रिय चेहरे झळकणार आहेत. या सीरिजचं पोस्टर समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रिया बापट आणि प्राजक्ता कोळीच्या या नव्या ‘अंधेरा’ सीरिजमध्ये एकूण ८ भाग आहेत. प्रत्येक भागात वेगळी उत्कंठा आणि ट्विस्ट पाहायला मिळतील. Priya Bapat |
View this post on Instagram
प्राइम व्हिडिओच्या ‘अंधेरा’ या मूळ मालिकेचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले आहे, “जेव्हा शहर झोपते, तेव्हा अंधेरा जागा होतो.” ट्रेलरमध्ये एका तरुणीच्या रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता होण्याच्या आणि तिचा शोध घेणाऱ्या इन्स्पेक्टर कल्पना कदम (प्रिया बापट) यांच्या कथेची दर्शकांना ओळख करून देतो. Priya Bapat |
दुसरीकडे, एक मेडिकल विद्यार्थी जय (करणवीर मल्होत्रा) आहे, जो आपल्या भावाच्या मृत्यूनंतर घडणाऱ्या विचित्र घटनांमुळे दुखी आहे. आता तो प्राजक्ता कोळीच्या मदतीने याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो. येथे त्यांचा सामना भयावह रहस्यांनी भरलेल्या अंधाऱ्या जगाशी होतो. Priya Bapat |
ही सीरिज गौरव देसाई, राघव दार, चिंतन सारडा आणि करण अंशुमन यांनी लिहिली आहे. तर राघव दार यांनी दिग्दर्शित केली आहे. ही सीरिज येत्या १४ ऑगस्टपासून अमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे. Priya Bapat |
हेही वाचा :
Malayalam Bigg Boss 7: लेस्बियन कपलची ‘बिग बॉस मलयाळम 7’मध्ये एंट्री….





