प्रिया बापटचा लाईव्ह कॉन्सर्टमधील अफलातून परफॉर्मन्स; कौतुकाचा होतोय वर्षाव

Priya Bapat | मराठी अभिनेत्री प्रिया बापटने नाटक, मालिका, चित्रपटांसह वेबसिरिजमध्ये देखील काम केले आहे. आपल्या अभिनयासह सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. याशिवाय ती उत्तम गायिका देखील आहे. नुकतेच प्रियाने लोकप्रिय कॉन्सर्टमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला आहे. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोकांचा याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
प्रिया बापटने इंडियन ओशन या बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणे गायले आहे. ज्याचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. प्रियाने सोशल मीडियावर या कॉन्सर्टची एक पोस्ट केली आहे आणि त्याला खास कॅप्शन दिलं आहे. प्रिया बापटने पोस्टमध्ये लिहिलं की, “ही आयुष्यातील सुंदर संध्याकाळ कायम माझ्या लक्षात राहील. कॉलेजपासून ज्या बँडचे मला कौतुक होते तो इंडियन ओशन बँडच्या कॉन्सर्टमध्ये गाणे गाण्याची संधी मिळेल कधी विचारपण केला नव्हता.” Priya Bapat |
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले की, “कॉलेजच्या दिवसांपासून मी या बँडची चाहती आहे. याच बँडने माझं खूप छान स्वागत केलं. मला त्यांच्यासोबत स्टेजवर उभं राहता आलं, हा क्षण मी कधीच विसरणार नाही. त्यावर चाहत्यांनी मनभरुन डान्स करणं, त्यांनी चिअर करणं आणि आमच्यासोबत त्यांनी गाणं हे सगळं माझ्यासाठी जादुई होतं. हे सगळं बघताना खूप छान वाटलं. 35 वर्ष त्यांचं म्युझिक अनेकांच्या काळजाला भिडलं. ती रात्र लक्षात राहण्यासारखी होती. मला माझे स्वप्न जगू दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे,” असे म्हणत तिने आपला आनंद व्यक्त केला. Priya Bapat |
प्रियाच्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पहिल्यांदाच प्रियाने स्टेजवर म्युझिक बँडसोबत लाईव्ह परफॉर्म केले आहे. जे सर्वांच्या पसंतीस पडले आहे.





