प्रिया बापट प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यासोबत करणार एकत्र काम; शेअर केले चित्रपटाचे पोस्टर

Priya Bapat | अभिनेत्री प्रिया बापटने आपल्या अभिनयाने सिने इंडस्ट्रीत मोठे स्थान मिळवले आहे. तिच्या अभिनयासह सौंदर्याचे लाखो लोक चाहते आहे. प्रिया बापट आता एक नवीन प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका हिंदी चित्रपटात प्रिया प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यासोबत झळकणार आहे. याबाबत तिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे.
इन्स्टाग्रामवर प्रिया बापटने तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहेत. चित्रपटात ती बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करताना पाहायला मिळणार आहे. Costao या चित्रपटातून प्रिया बापट आणि नवाजुद्दीन सिद्दीकी ही जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ‘झी 5’ वर प्रदर्शित होणार आहे. मात्र सिनेमाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटात नवाजुद्दीन कस्टम ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच चाहतेही प्रिया बापटला नव्या भूमिकेत पाहायला आतुर आहेत. दरम्यान, प्रियाने शेअर केलेल्या या पोस्टरवर चाहत्यांकडून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Priya Bapat |
प्रियाच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचं झाल्यास, तिने अनेक मराठीसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजमुळे प्रिया देशभरात लोकप्रिय झाली. यामध्ये तिने पूर्णिमा गायकवाड हे पात्र साकारलं आहे. Priya Bapat |
हेही वाचा :
कुख्यात गुंड निलेश घायवळवर कुस्तीच्या फडात हल्ला; पैलवानाने थेट कानशिलातच लगावली, VIDEO VIRAL





