Private bus services : डिझेल दरवाढीचा फटका; खासगी बससेवा 30 टक्क्यांनी महागण्याची शक्यता
Private bus services : डिझेलचे दर प्रतिलिटर शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने खासगी बससेवेचे तिकीटदर सुमारे ३० टक्क्यांनी वाढविण्याची शक्यता खासगी बसचालक संघटनांनी व्यक्त केली आहे.

Private bus services : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर डिझेलच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीचा फटका आता खासगी प्रवासी वाहतूक क्षेत्रालाही बसू लागला आहे. डिझेलचे दर प्रतिलिटर शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने खासगी बससेवेचे तिकीटदर सुमारे ३० टक्क्यांनी वाढविण्याची शक्यता खासगी बसचालक संघटनांनी व्यक्त केली आहे.
बस ओनर्स अँड ट्रॅव्हल एजंट्स वेल्फेअर असोसिएशनचे संयुक्त सचिव पुष्कर लुले यांनी मंगळवारी ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर येथून महाराष्ट्रातील विविध शहरांसह शेजारील राज्यांकडे सुमारे १२५ खासगी बस धावतात. (Private bus services)
मे महिन्यात पश्चिम आशियातील संघर्षामुळे डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे ७.५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे बसचालकांचे आर्थिक गणित कोलमडले असून, अनेकांना कमी फेऱ्यांमध्ये बस चालवाव्या लागत असल्याचे लुले यांनी सांगितले.
हेही वाचा – दोन दिवसांची तेजी खंडित; ‘या’ कारणामुळे सेन्सेक्स 479 अंकांनी घसरला
“प्रत्येक बससाठी दररोज सरासरी ३०० लिटर डिझेलची आवश्यकता असते. आमचे डिझेल पुरवठादार निश्चित असले तरी आता इंधन उपलब्धतेची खात्री करूनच बस सोडावी लागत आहे. बससेवा पूर्णपणे बंद झालेली नाही; मात्र काहीवेळा रिक्त जागा असलेल्या अन्य बसमध्ये प्रवाशांना समायोजित करावे लागत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Private bus services : डिझेल दरवाढीचा फटका; खासगी बससेवा 30 टक्क्यांनी महागण्याची शक्यता
सध्या तिकीटदर वाढविण्यात आलेले नसले तरी परिस्थिती कायम राहिल्यास किमान ३० टक्क्यांनी दरवाढ अपरिहार्य ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. यासंदर्भात खासगी बसचालकांची पुढील एक-दोन दिवसांत बैठक होणार असून त्यामध्ये अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. (Private bus services)
इंधनावरील कर कमी करून सरकारने प्रवासी आणि वाहतूक व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही संघटनेतर्फे करण्यात आली आहे.





