”ऑपरेशन’ला फक्त नाव देऊन काही फरक पडत नाही, तुम्हाला ते…’; पृथ्वीराज चव्हाण यांचे धक्कादायक विधान

Prithviraj Chavan on Operation Sindoor। जम्मूतील पहलगाम हल्ल्याचा भारतीय सैन्याने काल बदला घेत पाक आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशहतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्यांची ही प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषयी बनली आहे. त्यांनी ‘सिंदूर’ या शब्दाशी अनेक भावना जोडल्या गेल्या आहेत, परंतु भावनांनी युद्ध जिंकता येत नाही. ते शस्त्रे आणि दारूगोळ्याने जिंकले जाते. भावनिक फायदा मिळवण्यासाठी सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव निवडले होते, परंतु त्याचा जमिनीवर कोणताही फायदा होणार नाही.” असे म्हणत सरकारवर टीका केली आहे.
मोहिमेचे नाव महत्त्वाचे नाही Prithviraj Chavan on Operation Sindoor।
पृथ्वीराज चव्हाण यांनी या मोहिमेला देण्यात आलेल्या नावावरून, “मोहिमेचे नाव महत्त्वाचे नाही. ऑपरेशनचे नाव काहीही असो, शेवटी तुम्हाला पाकिस्तानात जाऊन दाखवावे लागेल की तुम्ही दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. भारतीय सशस्त्र दलांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणे थांबवण्यासाठी सरकारने नियमितपणे लोकांसोबत तपशील शेअर करावेत”, असेही ते म्हणाले.
VIDEO | Operation Sindoor: Here’s what Senior Congress leader Prithviraj Chavan (@prithvrj) said:
“Yes, there are a lot of sentiments attached to the word ‘sindoor’, but a war cannot be won by emotions. It is won with arms and ammunition. The name ‘Operation Sindoor’ was picked… pic.twitter.com/H8qBGqwKPz
— Press Trust of India (@PTI_News) May 7, 2025
‘ऑपरेशन सिंदूर’ या नावावर भाष्य करताना माजी केंद्रीय मंत्री म्हणाले की ,”युद्ध हे बंदुका, विमाने आणि बॉम्ब वापरून लढले जाते, प्रतीकात्मकता किंवा भावनांनी नाही.” तसेच ते पुढे बोलताना, “सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि खोटा अजेंडा पसरू नये म्हणून सरकारने नियमितपणे लोकांसोबत तपशील शेअर केला पाहिजे.”म्हणाले.
युद्ध बॉम्ब, बंदुका आणि विमानांनी लढले जाते Prithviraj Chavan on Operation Sindoor।
‘ऑपरेशन सिंदूर’ या सांकेतिक नावाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “सरकारने असा विचार केला असेल की त्यांना काही ‘भावनिक फायदा’ मिळेल. ते म्हणाले, “युद्धे बॉम्ब, बंदुका आणि विमानांनी लढली जातात, प्रतीकात्मकता किंवा दिखाऊ कृतींनी नाही. ऑपरेशन्सच्या नावाने युद्धे जिंकता येत नाहीत. ऑपरेशनचे नाव ठीक आहे. भारत सरकारने कदाचित असा विचार केला असेल की ऑपरेशनला हे नाव (सिंदूर) दिल्याने त्यांना काही भावनिक फायदा होईल.”
सशस्त्र दलांनी केलेल्या कारवायांबद्दल दोन महिला संरक्षण अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीचे त्यांनी स्वागत केले. काही विरोधी पक्षांनी भूतकाळात हवाई हल्ल्यांचे पुरावे मागितले होते याची आठवण करून देताना चव्हाण म्हणाले की, जगाला तुम्ही जे काही करता त्याचे पुरावे हवे असतात, त्यासाठी ठोस पुरावे हवे असतात.





