टेबल टेनिस स्पर्धेत पृथाला विजेतेपद

पुणे– पप्पु हळदणकर स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटात पृथा वर्टीकर हिने विजेतेपद संपादन केले. पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने डेक्कन जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत महिला गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित पृथा वर्टीकरने दुसऱ्या मानांकित स्वप्नाली नरलेचा 11-6, 11-9, 11-7, 11-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
17 वर्षाखालील मिश्र गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित नील मुळ्येने पाचव्या मानांकित इशान खांडेकरचा 11-8, 11-7, 7-11, 8-11, 11-4 असा तर, तिसऱ्या मानांकित शौरेन सोमणने दुसऱ्या मानांकित प्रणव घोळकरचा 11-5, 11-8, 8-11, 12-10 पराभव करून अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेचे उद्घाटन माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू एस रामास्वामी, पीडीटीटीएच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष दपक हळदणकर, अविनाश जोशी, दिपेश अभ्यंकर, अश्विन हळदणकर आदी उपस्थित होते.





