Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्येत बिघडली; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ म्हणाले…
Sanjay Raut : उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रकृतीबद्दल मोठा दावा केला आहे.

Sanjay Raut : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नव्या संसदीय कार्यसमितीची पुर्नस्थापन होणार असून, या समितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. एकीकडे या चर्चा सुरू असून उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रकृतीबद्दल मोठा दावा केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रकृती बरी नाही, त्यांच्याकडून फार काम होत नाहीये. ते अस्वस्थ आहेत इतक्या थकलेल्या माणसाने देशाचे नेतृत्व करु नये, मोदींच्या कॅबिनेटमधील ९९ टक्के मंत्री अकार्यक्षम आहेत आणि भारतीय जनता पक्षात एखादा दुसरा नेता सोडला तर त्या लायकीचे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात काम करु शकतील असं कोण दिसत नाही, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
अमित शहांना बाजूला केलं जात नाही तोपर्यंत…. संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत म्हणाले, “मोदींची प्रकृती बरी नाही, असं माझं म्हणणं आहे. मोदींना फार काम झेपत नाही. नेहरु शेवटच्या काळात फार थकले होते, तसे मोदी आता थकलेत शरीर साथ देत नाहीय. इतक्या थकलेल्या माणसाने देशाचे नेतृत्व करु नये, असा शब्दांत संजय राऊतांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले “अमित शहा यांची प्रतिमा इतकी डागाळलेली आहे की ते गृहखाते चालवत नसून एखाद्या गुंडाप्रमाणे टोळी चालवत आहेत वर्दीतल्या लोकांची, असं त्यांच्याविषयी उघडपणे बोललं जात आहे. या सगळ्यांचा परिणाम नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर झाला आहे आणि हे मोदींना पटतेय. या बदलातून जोपर्यंत अमित शहांना बाजूला केलं जात नाही तोपर्यंत कोणत्याही फेरबदलाल अर्थ उरला नाही, अशी दिल्लीत चर्चा आहे.” असे संजय राऊत यांनी सांगितले.
Bigg Boss 20 : ‘बिग बॉस २०’मध्ये शिवांगी जोशी सहभागी होणार? पोस्टद्वारे सांगितले सत्य






