पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर; 2014नंतर पहिल्यांदाच संघ मुख्यालयात जाणार

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी गुढीपाडव्याला नागपूरमध्ये येणार आहे. या दौऱ्यात ते रेशीमबागेतील संघ मुख्यालय जाणार आहेत, यासोबतच ते दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी 2014 नंतर एकदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेले नाहीत. मात्र आता ते गुढीपाडव्यानिमित्त येथे उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 30 मार्च 2025 रोजी सकाळी विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते थेट रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात जातील. त्या ठिकाणी संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे स्वागत केले जाईल.
यावेळी पंतप्रधान संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर पंतप्रधान दीक्षाभूमी येथे जाण्याची शक्यता असून तेथे मोदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन करतील. Narendra Modi |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित माधव नेत्रालयाच्या इमारतीच्या भूमिपजूनसाठी पंतप्रधान मोदी नागपूला येणार आहेत. या ठिकाणी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेही उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी भारतीय सैन्यासाठी विशेष शस्त्र निर्माण करणाऱ्या सोलार इंडस्ट्रीजच्या उत्पादन प्रकल्पालाही भेट देणार असल्याची शक्यता आहे. Narendra Modi |
पंतप्रधानांच्या या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची पाहणी केली. या संपूर्ण मार्गावर भेट देऊन मनपा व पोलिस प्रशासनाद्वारे पाहणी करून आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत. Narendra Modi |
हेही वाचा:
Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंना दणका, शिंदेंना फटका; स्नेहल जगताप करणार राष्ट्रवादीत प्रवेश





