पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरमध्ये; कसे असणार पाच तासांच्या दौऱ्याचे नियोजन?

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवार, ३० मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. विशेष म्हणजे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाला भेट देणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात पंतप्रधान मोदी यांचा दौरा ऐतिहासिक मानला जात आहे. यावेळी माधव नेत्रालयाच्या इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय रेशीमबागेतील स्मृती मंदिर, दीक्षाभूमी आणि सोलर डिफेन्स प्रकल्पाला ते भेट देणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या ११ वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच रेशीमबाग येथील संघाच्या स्मृती मंदिराला रविवारी भेट देणार आहेत. आज गुढीपाडव्याला मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नागपुरात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मोदींच्या आजच्या पाच तासांच्या नागपूर दौऱ्याचे नियोजन कसे असणार आहे? ते पाहुयात…
पंतप्रधानांच्या सर्व कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि राज्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार आहेत. PM Narendra Modi |
मोदींच्या स्वागतासाठी नागपूर सजले
गुढीपाडवा आणि पंतप्रधानांच्या दौऱ्याचे निमित्त साधून भाजपने अभूतपूर्व स्वागताची तयारी केली आहे. विविध ठिकाणी त्यांच्या भेटी व कार्यक्रम स्थळापर्यंतचा सुमारे ३० किलोमीटरचा मार्ग आणि ४७ चौक सुशोभित करण्यात आले आहेत. रेशीमबाग चौकात भगवी तर दीक्षाभूमी चौकात निळी सजावट करण्यात आली आहे. जागोजागी मोदींचे ‘एक है तो सेफ है’, ‘ मोदी है तो मुमकीन है’ असे कटआऊटस लागले आहेत. तसेच प्रमुख चौकांत गुढी उभारून मिठाई वाटप केली जाईल. PM Narendra Modi |
मुख्य रस्ते नागरिकांसाठी बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, रविवारी सकाळी ९ वाजतापासून शहरात नियोजित कार्यकमाकरिता हजर राहतील. त्याकरिता सकाळी ६ वाजतापासून डॉ. हेडगेवार स्मृती भवन, दीक्षाभूमी, माधव नेत्रालय या जवळील मार्गांवर वाहतूक पोलिस बंदोबस्त राहणार आहे. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांचे आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी ज्या परिसराला मोदी भेट देणार आहेत, त्या परिसरातील सर्व मुख्य रस्ते नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येतील. त्याकरिता पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असा असणार दौरा…
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी ८.४० वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल.
- त्यानंतर ते थेट रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्मृती मंदिरस्थळी जाणार आहेत. तेथे हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते दीक्षाभूमीला भेट देतील.
- ९.३० वाजता पंतप्रधानांच्या हस्ते हिंगणामार्गावरील माधव नेत्रालयाच्या प्रीमिअम केंद्राची पायाभरणी होणार आहे. त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करतील.
- दुपारी १२:३० वाजता अमरावती मार्गावरील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड येथे लॉइटरिंग युद्धोपयोगी सामग्री चाचणी तळ आणि यूएव्हीसाठी धावपट्टी सुविधेचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल.
- त्यानंतर १.३० ते बिलासपूरला रवाना होतील. PM Narendra Modi |
हेही वाचा:
Morning : सकाळी उठल्याबरोबर करा हे काम, दुर्भाग्य दूर होईल !





