पूर परिस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री- मुख्यमंत्री यांची चर्चा

मुंबई :- राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात आज सायंकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे त्याचप्रमाणे कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती दिली.
राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री @narendramodi आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. राज्य शासनामार्फत सुरु असलेले बचावकार्य व उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी श्री. मोदी यांना माहिती दिली. बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल- श्री.मोदी pic.twitter.com/qh6MO4Gila
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 22, 2021
बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.





