पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्र, झारखंडमधील मतदारांना उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन

Prime Minister Narendra Modi । देशातील महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचे मतदान आज पार पडत आहे . त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यातील मतदारांना पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील मतदानासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट करत “आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील मतदारांनी पूर्ण उत्साहाने सहभागी होऊन लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी, असे मी आवाहन करतो. या निमित्ताने मी सर्व तरुणांना आवाहन करतो. आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे,” असे आवाहन केले आहे.
आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागांसाठी मतदान होत आहे.राज्यातील सर्व मतदारांना माझे आग्रहाचे आवाहन आहे की त्यांनी उत्साहाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी.यावेळी सर्व तरुण आणि महिला मतदारांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने…
— Narendra Modi (@narendramodi) November 20, 2024
महाराष्ट्रातही बुधवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी ६ वाजता संपेल. 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे. एकूण 4,136 उमेदवार निवडणूक लढवत असून त्यात 2,086 अपक्षांचा समावेश आहे. भाजप 149, शिवसेना 81, आणि राष्ट्रवादी 59 जागा लढवत आहे. काँग्रेसने 101, शिवसेना (यूबीटी) 95, आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) 86 उमेदवार उभे केले आहेत. बसपा 237 जागा लढवत आहे, तर इतर छोटे पक्ष 237 जागा लढवत आहेत. देखील रिंगणात आहेत. राज्यात अंदाजे ९.७ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत.
झारखंड में आज लोकतंत्र के महापर्व का दूसरा और आखिरी चरण है। सभी मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे इसमें बढ़-चढ़कर भागीदारी करें और वोटिंग का नया रिकॉर्ड बनाएं। इस अवसर पर पहली बार वोट डालने जा रहे अपने सभी युवा साथियों का मैं विशेष अभिनंदन करता हूं। आपका एक-एक मत राज्य की ताकत है।
— Narendra Modi (@narendramodi) November 20, 2024
दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान बुधवारी सकाळी ७ वाजता सुरू झाले असून उर्वरित ३८ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. तत्पूर्वी जामतारा, देवघर आणि अनेक बूथवर सायंकाळी पाचच्या सुमारास मॉक पोलिंग घेण्यात आले.





