पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या लसीचा आढावा घेऊन हैदाराबादच्या दिशेने रवाना

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादच्या जायडस कॅडिलाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आढावा घेतला आणि ते आता हैदराबादच्या दिशेने रवाना झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या लसीच्या विकासाबाबत काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. त्यात पुणे, अहमदाबाद आणि हैदराबादचा समावेश आहे.
अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपन्यांमध्ये लशीचं उत्पादन करण्यात येत आहे. या ठिकाणी भेट देऊन कोरोनाच्या लस उत्पादनाची स्थिती काय आहे याचा आढावा पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत.
Visited Zydus Biotech Park in Ahmedabad to know more about the indigenous DNA based vaccine being developed by Zydus Cadila. I compliment the team behind this effort for their work. Govt of India is actively working with them to support them in this journey: PM Modi#COVID19 https://t.co/EyiJfxjMxN pic.twitter.com/5yEn2b31tH
— ANI (@ANI) November 28, 2020
अहमदाबाद विमानतळावर सकाळी 9 वाजता पंतप्रधान मोदींचे आगमन झाले होते. त्यांनंतर मोदी झायडस कॅडिला कंपनीच्या दिशेने रवाना झाले. अहमदाबादपासून 20 किमी अंतरावर असणाऱ्या झायडस कॅडिला या कोरोना लस तयार करणाऱ्या कंपनीला पंतप्रधानांनी भेट दिली. पंतप्रधान मोदींनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि कोरोनाच्या लसीच्या विकासाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. झायडस कॅडिला ही कंपनी झायकोविड या लशीचे संशोधन करत आहे. या लशीचे दुसऱ्या टप्प्यातील मानवी क्लिनिकल ट्रायल प्रगतीपथावर आहे.
नरेद्र मोदींनी या ठिकाणी एक तासांहून जास्त वेळ घालवला. त्यानंतर ते हैदराबादच्या दिशेने रवाना झाले. हैदराबादमध्ये मोदी भारत बायोटेक या लस निर्मीती कंपनीला भेट देणार आहेत. ही कंपनी हैदराबादपासून 50 किमी अंतरावर आहे. भारत बायोटेक, आयसीएमआर आणि एनआयव्ही संयुक्तपणे कोव्हॅक्सिन या लशीवर संशोधन करत आहे. भारत बायोटेकच्या या लशीचे तिसऱ्या टप्प्यातील माणसांवरचे क्लिनिकल ट्रायल प्रगतीपथावर आहे. क्लिनिकल ट्रायल 26 हजार स्वयंसेवकांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टप्प्याटप्प्याने स्वयंसेवकांना लस दिली जात आहे.
हैदराबाद भेटीनंतर पंतप्रधान मोदी पुण्याच्या सीरम इंन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. साधारणत: सायंकाळी 4.30 च्या दरम्यानं मोदी या ठिकाणी पोहचतील. या ठिकाणी मोदी जवळपास एक तासांचा काळ व्यतीत करणार आहेत. त्यादरम्यान सीरम इन्स्टिट्यूटतर्फे विकसीत करण्यात येणाऱ्या लसीची सद्यस्थिती, त्याचे उत्पादन,वितरण व्यवस्था याचा आढावा घेणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ही अॅस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्डच्या मदतीने कोरोनावर लस बनवत आहे. ही लस अंतिम टप्प्यात आहे. सरकारने याच्या इमर्जंसी ट्रायलला मंजुरी दिली तर ही लस भारतातीयांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध शक्यता आहे. यानंतर सायंकाळी नरेंद्र मोदी परत दिल्लीला रवाना होणार आहेत.





