पिंपरी | आवक वाढल्याने पालेभाज्यांचे दर ढासळले

पिंपरी, (प्रतिनिधी) – मोशी उपबाजारमध्ये गेल्या आठवड्यांच्या तुलनेने, पालेभाज्यांची अवक वाढली आहे. दुसरीकडे फळभाज्यांची आवक स्थिर आहे. सध्या चिंचवड येथील मंडईत पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. पालेभाज्यांचे दर स्वसत झाल्याने नागरिकांनी पालेभाज्या खरेदीवर जोर लावल्याचे चित्र मंडईत दिसत होते. मोशी येथील उपबाजार समितीत रविवारी (दि. १४) रोजी ४२,४०० गड्डी पालेभाज्यांची, १९९ फळे, तर ३,२३० फळभाज्यांची आवक क्विंटलमध्ये झाली आहे.
चिंचवड येथील भाजी मंडईतील किरकोळ बाजारातील आजचे दर – टोमॅटो १००, शेवगा २००, दोडका १००, मिरची ८०, काकडी ५०, वाटाणा २००, वांगी ८०, गवार १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
पालेभाज्या – दर (प्रति जुडी रुपयांत) मेथी १० ते २०, कोथिंबीर १० ते २०, कांदापात २० ते ३०, शेपू २० ते ३०, पालक २० ते ३० लहान मोठ्या जुडी नुसार.
मोशी उपबाजारातील आवक (क्विंटलमध्ये) – पालेभाज्या – ४२,४०० गड्डी, फळे १९९ आणि फळभाज्यांची आवक ३,२३० क्विंटल झाली. कांदा ४१५, बटाटा ८६७, लसूण ६३, आले २४, भेंडी ६०, गवार १८, टोमॅटो २४६, घेवडा ०८, दोडका २५, मिरची १६५, दुधी भोपळा ८३, भुईमुग शेंग ७, काकडी १२८, कारली ३७,
डांगर ४८, गाजर ९८, फ्लॉवर २६२, कोबी १३९, वांगी १३६, ढोबळी ४४, तोंडली ०६, बीट १५, पावटा ०२, वाल १५, शेवगा १७, कैरी०३, रताळी १७, कडीपत्ता १६, लिंबू ४६, मका कणीस १८५ क्विंटल आवक झाली आहे. तर कोथिंबीर २७,०००, मेथी १२,९००, शेपू ६००, कांदापात १,६००, पालक ६,१०० चवळी १,१००, पुदिना १,९०० गड्डी आवक झाली आहे.


